दिशा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

3 Min Read

या शस्त्रक्रिया होणार सवलतीत 

अँजिओप्लास्टी, कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, मणक्याचे आजार, ब्रेन ट्यूमर, गादी सरकलेले, मणक्यातील नस दबलेले, मणक्यातील गॅप आलेले शस्त्रक्रिया या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार हे १०० टक्के मोफत होणार आहेत त्याच बरोबर औषधी गोळ्या सुद्धा अगदी मोफत दिल्या जाणार आहेत. तर हाडांच्या शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रिया जनरल सर्जरी आणि स्त्रीरोग शस्त्रक्रिया उपचार ५० टक्के सवलतीमध्ये केल्या जाणार आहेत. शहरातील सह्याद्री हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटल, काळे हॉस्पिटल, गोरे हॉस्पिटल, सदासुख (सारडा) हॉस्पिटल, सिग्मा आय हॉस्पिटल लातूर, गणेश नेत्रालय निलंगा या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याशिवाय या सह्याद्री हॉस्पिटल, निदान डायग्नोसिस सेंटर व ओमसाई लॅब येथे रक्त, सिटीस्कॅन आणि एमआरआय या आरोग्य सुविधा ५० टक्के सवलतीत करण्यात येणार आहे. त्यामुळे आता गरीब रुग्णांनासुद्धा या आजारांवरील उपचार सवलतीत या रुग्णालयात मिळणार आहेत.

>> मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : गरजू रुग्णांना पाठबळ देत रुग्णांचा आधारवड ठरलेल्या दिशा प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे.

     संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिशा प्रतिष्ठानचा शनिवार दि. 23 मार्च रोजी चौथा वर्धापनदिन संपन्न होत आहे. यानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया शिबीर होणार असून जिल्ह्यातील रेणापूर, अहमदपूर, चाकूर, वलांडी, औसा, शिरूर अनंतपाळ, निलंगा, जळकोट, उदगीर या सर्व ठिकाणी विविध रुग्णालयात प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी 23 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांवर सह्याद्री हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटल, काळे हॉस्पिटल, गोरे हॉस्पिटल, सदासुख हॉस्पिटल, सिग्मा आय हॉस्पिटल, गणेश नेत्रालाय या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शास्त्रक्रियेमध्ये हाडांच्या, डोळ्यांच्या, कान, नाक, घसा, जनरल व स्त्रीरोगावरील शास्त्रक्रिया 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. तर अँजिओप्लास्टी, कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, मणक्याचे आजार, ब्रेन ट्युमर, या आजाराची शस्त्रक्रिया 100 टक्के सवलतीच्या दरात मोफत औषधासह केले जाणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिशा प्रतिष्ठानचे डॉ.अशोक पोद्दार, अभिजित देशमुख, डॉ.चेतन सारडा, डॉ.हनुमंत किणीकर, संतोष देशमुख, प्रसाद उदगीरकर, किशोर भुजबळ, रतन बिदादा, अविनाश कामदार, प्रसाद जोशी, महेश मालपाणी, पप्पू घोलप यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी सोनू डगवाले, इसरार सगरे, अॅड. वैशाली यादव, जब्बार पठाण, विष्णू धायगुडे, अजय शहा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सवलतीत वैद्यकीय शस्त्रक्रियेच्या नावनोंदणी साठी यांच्याशी संपर्क साधावा

• कोंबड़े हॉस्पिटल, 5 नंबर चौक, लातूर 

• देशमुख हॉस्पिटल, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, रेणापूर

• भाऊ हॉस्पिटल, थोडगा रोड, अहमदपूर 

• आधार हॉस्पिटल जुन्या बसस्टैंड समोर, चाकूर 

• स्पंदन हॉस्पिटल शेल्हाळ रोड, उदगीर 

• रुक्मिणी हॉस्पिटल, बस डेपो जवळ, जळकोट 

• श्रीकृष्ण क्लिनिक, दि इंडियन अर्बन बँके जवळ वलांडी 

• साई हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निलंगा 

• सह्याद्री हॉस्पिटल, लातूर-औसा रोड, एमआयडीसी समोर, औसा 

• सरस्वती हॉस्पिटल, उदगीर रोड, शिरूर अनंतपाळ.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!