नवीन कार घेताय? मग घाई करा, येत्या १ एप्रिलपासून लोकप्रिय किया कंपनीच्या कार महागणार

1 Min Read

>> मुखपत्र दक्षता वृत्तांत 

जर तुम्ही या नवीन आर्थिक वर्षात नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, नवीन कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागेल. येत्या 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होताच देशातील दिग्गज आॅटो कंपनी कियाने आपल्या कारच्या किमतीत वाढ करुन ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. किया इंडियाने 21 मार्च रोजी आपल्या वाहनांच्या किमती 3% ने वाढवण्याची घोषणा केली आहे. किया भारतीय बाजारपेठेत एकूण 4 कार विकते त्यापैकी सेल्टोस, सोनेट आणि केरेन्स कारच्या किमती वाढवल्या आहेत. कियाने प्रीमियम इलेक्ट्रिक SUV EV6 च्या किमतीत कोणतीही वाढ जाहीर केलेली नाही. वाढलेल्या किमती 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील. वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ आणि पुरवठा साखळीशी संबंधित इनपुट्समुळे कंपनीने किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, किया इंडियाने देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात एकत्रितपणे 11 लाखांहून अधिक कार विकल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!