अफवा पसरवून दहशत माजविणाऱ्या तिघांना विवेकानंद चौक पोलिसांकडून अटक 

1 Min Read

»मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : शहरातील नांदेड नाका परिसरातील गरुड चाैक, महादेव नगर, करिम नगर, प्रबुद्ध नगर, नूरजहाँ काॅलनी, जय नगर, बरकत नगर, संजय नगर, नाथ नगर, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी आणि इंदिरा नगर परिसरात जवळपास दाेन आठवड्यापासून अज्ञात चाेरट्यांच्या टाेळ्या रात्री फिरत असल्याच्या चर्चा होत्या. या अज्ञात टाेळीला पकडण्यासाठी विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस आणि स्थानिक नागरिक रात्र-रात्र जागून काढत होते. या ‘चोरट्या’च्या नावाने हातात शस्त्र घेऊन अफवा पसरविणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातले आहे. यावेळी लाईट जाण्याचा फायदा घेऊन काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती प्रसारित करीत असल्याच्या ही तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर हातात शस्त्र घेऊन पोस्ट, व्हिडिओ, क्लिप्स, फोटो प्रसिद्ध होत होते. लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढेल असे मेसेज पाठवित होते. अखेर या व्हिडिओतील व्यक्तींना ताब्यात घेण्यात विवेकानंद चौक पोलिसांना यश आले आहे. अधिक तपास विवेकानंद चौक पोलीस करत आहेत.

 

Contents
»मुखपत्र दक्षता वृत्तांतलातूर : शहरातील नांदेड नाका परिसरातील गरुड चाैक, महादेव नगर, करिम नगर, प्रबुद्ध नगर, नूरजहाँ काॅलनी, जय नगर, बरकत नगर, संजय नगर, नाथ नगर, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी आणि इंदिरा नगर परिसरात जवळपास दाेन आठवड्यापासून अज्ञात चाेरट्यांच्या टाेळ्या रात्री फिरत असल्याच्या चर्चा होत्या. या अज्ञात टाेळीला पकडण्यासाठी विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस आणि स्थानिक नागरिक रात्र-रात्र जागून काढत होते. या ‘चोरट्या’च्या नावाने हातात शस्त्र घेऊन अफवा पसरविणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातले आहे. यावेळी लाईट जाण्याचा फायदा घेऊन काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती प्रसारित करीत असल्याच्या ही तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर हातात शस्त्र घेऊन पोस्ट, व्हिडिओ, क्लिप्स, फोटो प्रसिद्ध होत होते. लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढेल असे मेसेज पाठवित होते. अखेर या व्हिडिओतील व्यक्तींना ताब्यात घेण्यात विवेकानंद चौक पोलिसांना यश आले आहे. अधिक तपास विवेकानंद चौक पोलीस करत आहेत.मोठया प्रमाणात पोलिसांची गस्त सुरु असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास डायल ११२ किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा– सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर.

 

मोठया प्रमाणात पोलिसांची गस्त सुरु असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास डायल ११२ किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!