स्थानिक गुन्हे शाखेने एकाकडून केले अग्निशस्त्र व काडतूस जप्त ; पोलीस अधीक्षकांकडून पोलीस पथकाचे कौतुक

2 Min Read

»मुखपत्र दक्षता वृत्तांत

नांदेड : येथील गोवर्धन घाट पुलाखाली एकाकडून पोलिसांनी एक अग्निशस्त्र (गावठी कटटा) व एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई १३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. याप्रकरणी पोलीस ठाणे वजिराबाद येथे गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरु आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड येथील वजीराबाद हद्दीत गस्तीवर असतांना गोवर्धन घाट पुलाखाली एक इसम थांबलेला असून त्याचेकडे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने एका व्यक्तीस थांबवून तपासणी केली असता, त्याच्या कमरेला एक अग्निशस्त्र (गावठी कटटा) व एक जिवंत काडतूस असा एकूण २०,६००/- रुपयाचा मुद्देमाल मिळाला असून त्यास मिळुन आलेल्या अग्निशस्त्राबाबत विचारपुस केली असता सदरचे अग्निशस्त्र त्याने त्याचा मित्र शेख अहेमद ऊर्फ शेख असलम व त्याची पत्नी यांच्याकडून २०,०००/- रुपयास खरेदी सांगितले आहे. नमूद आरोपीतांविरुध्द पोलीस ठाणे वजिराबाद येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे, पोलीस अंमलदार गंगाप्रसाद दळवी, कलंदर, राजीव बोधगीरे, शेख इसराईल, साहेबराव कदम, अनिल बिरादार, अकबर पठाण यांनी पार पाडली. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!