लातूर : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

1 Min Read

»मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर जिल्ह्यातील सर्वांधिक पदाधिकारी, आमदार, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. बहुतांश पदाधिकारी अजित पवारांसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने नव्याने लातूर जिल्हयातील जिल्हा कार्यकारणी, तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा गुरुवारी (दि.18) केली आहे. या जम्बो कार्यकारिणीतून कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या देताना संधी देण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष पदी ९ जणांची, जिल्हा प्रवक्ता पदी एक जणांची, कार्यालयीन सरचिटणीस पदी एक जणांची, जिल्हा सरचिटणीस पदी ७ जणांची, चिटणीस / सचिव पदी १३ जणांची, सहचिटणीस / सहसचिव ८ जणांची, संघटक सचिव ८ जणांची सह संघटक सचिव पदी ४ जणांची, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तालुका अध्यक्ष, तालुका कार्याध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व शहर अध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या गटातून कार्यकारिणी समिती नियुक्ती करून जिल्ह्यात पक्षाचे काम सुरू राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!