सारथीचे २०, महाज्योतीचे १८ तर बार्टीचे १६ विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या – २०२३ (यूपीएससी) परीक्षेत सारथीचे २०, महाज्योतीचे १८ तर बार्टीचे १६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

मराठा कुणबी, कुणबी, कुणबी मराठी या संवर्गातील उमेदवारांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवविकास संस्था (सारथी) मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिले जाते. ओबीसी घटकांसाठी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कार्यरत आहे. या शासनाच्या तीनही संस्थांद्वारे नागरी सेवेत या विविध घटकांतील उमेदवारांसाठी प्रशिक्षण देण्यासह विविध योजनांतून अर्थसहाय्य दिले जाते. त्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या – २०२३ च्या परीक्षेत वरील तीन संस्थांद्वारे प्रशिक्षणासह अर्थसहाय्याचा लाभ घेतलेल्या ५४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!