लातूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेश कांबळे यांना मिळेल मतदारांची पसंती 

3 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर /प्रतिनिधी : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मराठवाड्यात लातूरची लोकसभा नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिली आहे. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते उमेश कांबळे हे निवडणूक लढविणार आहेत. शुक्रवारी श्री.कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ते उमेश कांबळे यांना मतदारांची पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण, लातूरची जनता राजकीय पक्षाला कंटाळली असून नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. त्यामुळे कांबळे यांच्या माध्यमातून जनता सत्ताधाऱ्यांना हबाडा देणार हे दिसून येत आहे. राज्यात नेहमीच चुरशीची ठरणाऱ्या लातूर लोकसभा मतदारसंघात यावेळेला मतदार नव्या चेहऱ्याला संधी देऊन इतिहास घडवू शकतात अशी चर्चा लातूर मतदारसंघात व राजकीय वर्तुळात केली जात आहे. कारण, लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघाची ओळख देशपातळीवर आहे. त्यामुळे लातूरची चर्चा नेहमीच देशपातळीवर होताना दिसते. परंतु मागील दोन टर्म पासून भाजपाचा उमेदवार येथे निवडून येत आहे. विद्यमान खासदारांचा जनतेशी नसलेला संपर्क, मराठा समाज आणि धनगर समाज यांची आरक्षण विषयावर असलेली भाजपा वरील नाराजी, वाढती महागाई, बंद असलेली नौकरभरती, जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न, शेतकरी – शेतमजूर यांच्या प्रश्नांचा भाजपाला पडलेला विसर याबाबत सरकारचे उदासीन धोरण, लातूर जिल्ह्यातील विकासाचे सर्व प्रश्न सोडवण्यात भाजपाला आलेले अपयश, भ्रष्टाचाराला अभय व संरक्षण, पक्ष फोडाफोडीचे अभद्र व खालच्या पातळीवरील राजकारण, कॉंग्रेसच्या घराणेशाहीला प्रखर विरोध आणि आपल्या घराणेशाहीचा उजळमाथ्याने पुरस्कार असे भाजपचे दुतोंडी वागणे, भाजपामुळे भारतीय लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. देशात अघोषित हुकूमशाही सुरू असल्याचे सर्वसामान्य जनतेचे मत बनले आहे आदी विविध बाबींवर भारतीय जनता व सुज्ञ मतदार नाराज आहेत. तशातच भाजप नेत्यांची मागील काही दिवसांत सामान्य जनतेशी तुटलेली नाळ यामुळे प्रस्थापित स्वार्थी, दलबदलू व ढोंगी राजकारणाला लातूर जिल्ह्यातील जनता आता कंटाळली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळेला प्रस्थापितांना धक्का देत मतदार नव्या चेहऱ्याला संधी देऊन इतिहास घडवू शकतात अशी चर्चा सध्या लातूर लोकसभा मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते उमेश कांबळे यांनी या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास व विचार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कांबळे हे मूळचे लातूर शहराच्या पुर्व भागातील रहिवाशी आहेत. कांबळे हे अभ्यासू, उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व आहे. ते नेहमीच सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, तळागाळापर्यंत असलेला जनतेचा थेट संपर्क, उच्चशिक्षित, जनमाणसांत असलेली स्वच्छ प्रतिमा या सर्व उमेश कांबळे यांच्या जमेच्या बाजू आहेत. सर्व सामान्यांसाठी अन्यायाविरूद्ध आवाज उठविणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यामुळे लातूर लोकसभेत असणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघाची व तेथील प्रश्नांची कांबळे यांना चांगलीच जाण व अभ्यास आहे. यासोबतच महापुरूषांच्या विचारांचा जागर ते आपल्या प्रबोधनातून नेहमीच करीत असतात. त्यामुळे निष्कलंक व आश्वासक चेहरा लातूर लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आल्याने लातूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला आता उमेश कांबळे यांच्या रूपाने नवा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे लातूरची जनता यावेळी इतिहास घडवेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!