पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या परभणीत सभा

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

परभणी / प्रतिनिधी : परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या मंगळवारी परभणीत जाहीर सभा होणार असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यातील ही सभा लक्षवेधीच ठरणार आहे. लोकसभा असो विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या अंतिम टप्प्यात या जिल्हास्थानी ठाकरे कुटूंबियांची जाहीर सभा होत आली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक निवडणुकीत मतदानाच्या दोन दिवस आधी परभणीत आवर्जून हजेरी लावून जंगी सभा घेत आले आहेत. ठाकरे यांची ही प्रत्येक सभा निर्णायकही ठरत आली आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही मालिका कायम राखली. या जिल्हास्थानी प्रत्येक निवडणुकीच्या रणधुमाळीच्या समारोपाप्रसंगी जंगी सभा घेतल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!