लातुरात रजा मंजूर करण्यासाठी लाच घेणारा आगार व्यवस्थापक एसीबीच्या जाळ्यात

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील लातूर आगार कार्यालयातील आगार व्यवस्थापक बालाजी वसंतराव आडसुळे (वय 50 वर्षे) यांना अर्जित रजा मंजूर करून घेण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दोन हजाराची लाच घेताना पकडले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग, लातूर आगार येथे एस.टी. बसचे चालक (ड्रायव्हर) म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला घरी लग्नकार्य व घराचे बांधकाम असल्याने सन 2024-2025 वर्षातील 15 दिवस अर्जित रजा व 15 दिवस रजा रोखीकरण मंजूर करून हवी होती. त्यासाठी आगार व्यवस्थापक बालाजी वसंतराव आडसुळे यांच्याकडे रजेचा अर्ज करण्यात आला होता. आलोसे आडसुळे यांनी अर्जित रजा व रजा रोखीकरण मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे 2,000/- रुपये लाचेची मागणी केली. संबंधित तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केली असता रजा मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले. लातूर आगार कार्यालयात सापळा रचून आलोसे आडसुळे यांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!