लातूर : उमेदवारांच्या खर्चाचा निवडणूक निरीक्षक घेणार आढावा 

1 Min Read

कोणत्याही व्यक्तीस उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रत हवी असल्यास प्रत्येक प्रतीस 1 रुपये इतकी रक्कम भरून खर्चाच्या नोंदवहीची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडून प्राप्त करून घेता येईल, असेही श्री. चाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियंत्रणविषयक निर्देशानुसार 41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या नोंदवहीची तपासणी 27 एप्रिल 2024 निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्याकडून केली जाणार आहे. लातूर येथील नवीन शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ही नोंदवही तपासणी होईल. तसेच निवडणूक काळात एकूण तीन वेळा नोंदवही तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची पहिली तपासणी 27 एप्रिल 2024 रोजी, दुसरी तपासणी 2 मे 2024 आणि तिसरी तपासणी 5 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी स्वत: किंवा त्यांचा प्राधिकृत निवडणूक प्रतिनिधी यांनी खर्चाची नोंदवही, प्रमाणके, निवडणुकीसाठी खर्चाचे बँक पासबुकसह तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे निवडणूक संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी कळविले आहे. उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्या तपासणी दरम्यान जनतेचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!