वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

धाराशिव / प्रतिनिधी : तुळजापूर व बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या पीकअप वाहनाचा व दुचाकीचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. गुप्तबातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून धाराशिव स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केज जि. बीड येथे जाऊन वाहन चोरीचा तपास करत असताना चोरीच्या वाहनासह दोन आरोपीना ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच आरोपीनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने चोरीच्या उद्देशाने वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी १)नय्युम शब्बीर शेख, वय ४५ वर्षे रा. केज जि. बीड, २) प्रितम मोहनराव चव्हाण, वय २७ वर्षे, रा. केज जि. बीड यांच्याकडून अशोक लेलॅड दोस्त कंपनीचा पिकअप वाहनासह चोरी केलेली होंडा शाईन दुचाकी असा जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वात सपोनि सुदर्शन कासार, पोलीस अंमलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, रत्नदिप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!