नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लव्ह जिहादचे दावे फेटाळले 

1 Min Read
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाविद्यालय परिसरात तीव्र निषेध आंदोलन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाविद्यालय परिसरात तीव्र निषेध आंदोलन

नेहा हिरेमठच्या मारेकऱ्यास फाशी द्या लातूर जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय जंगम संघटनेचे निवेदन

र्नाटकच्या हुबळी-धारवाड येथील नेहा हिरेमठ (२३ वर्ष) ही विद्यार्थीनी हुबळीच्या बीव्हीबी महाविद्यालयात मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन्स (MCA) चे शिक्षण घेत होती. या मुलीचा तिच्याच महाविद्यालयात दिवसाढवळ्या निघृण खून करण्यात आला. खून करणारा हा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असून त्याला काही तासातच पोलिसांनी अटकही केली. मात्र या हत्येनंतर कर्नाटक राज्यासह देशात राजकारण तापले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घटना घडल्याच्या दिवशीपासूनच (दि. १८ एप्रिल) महाविद्यालय परिसरात तीव्र निषेध आंदोलन छेडले असून भाजपाने हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लव्ह जिहादचे दावे फेटाळले असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला जाईल. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयही स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!