» मुखपत्र दक्षता वृत्तांत
औसा / प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे बऱ्हाणपूर येथे लाईटकामासाठी ठेवलेल्या 20 फुटी लोखंडी पोलची चोरी करणाऱ्या दोन संशयितांना भादा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिगंबर भागवत गवळी (वय 30 वर्ष) राहणार प्रकाश नगर लातूर, अनिल विलास गायकवाड (वय 26 वर्ष) राहणार भादा ता. औसा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, 9 एप्रिल रोजी रात्री 8 च्या नंतर 2 लोखंडी पोल चोरीला गेल्याची तक्रार भादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. भादा पोलिसांनी गतिमान तपास करीत संशयित दिगंबर भागवत गवळी (वय 30 वर्ष) राहणार प्रकाश नगर लातूर, अनिल विलास गायकवाड (वय 26 वर्ष) राहणार भादा ता. औसा याना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान या दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन पोलिसांनी चोरीला गेलेले 20 फुटाचे 2 लोखंडी पोल असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठाच्या मार्गदर्शनात भादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि राहुलकुमार भोळ यांच्या नेतृत्वात पीएसआय कुसमे, पोलीस अंमलदार क्षीरसागर, फड, पठाण यांनी पार पाडली.
Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांतऔसा / प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे बऱ्हाणपूर येथे लाईटकामासाठी ठेवलेल्या 20 फुटी लोखंडी पोलची चोरी करणाऱ्या दोन संशयितांना भादा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिगंबर भागवत गवळी (वय 30 वर्ष) राहणार प्रकाश नगर लातूर, अनिल विलास गायकवाड (वय 26 वर्ष) राहणार भादा ता. औसा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, 9 एप्रिल रोजी रात्री 8 च्या नंतर 2 लोखंडी पोल चोरीला गेल्याची तक्रार भादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. भादा पोलिसांनी गतिमान तपास करीत संशयित दिगंबर भागवत गवळी (वय 30 वर्ष) राहणार प्रकाश नगर लातूर, अनिल विलास गायकवाड (वय 26 वर्ष) राहणार भादा ता. औसा याना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान या दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन पोलिसांनी चोरीला गेलेले 20 फुटाचे 2 लोखंडी पोल असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई वरिष्ठाच्या मार्गदर्शनात भादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि राहुलकुमार भोळ यांच्या नेतृत्वात पीएसआय कुसमे, पोलीस अंमलदार क्षीरसागर, फड, पठाण यांनी पार पाडली.