काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंसाठी राहुल गांधी मैदानात, उद्या सोलापूरात जाहीर सभा

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ठिकठिकाणी स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी (दि. 24) दुपारी जाहीर सभा होणार आहे.

सोलापूरची विमानसेवा बंद असल्याने ते लातूरमार्गे सिंहगड महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर उतरणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. 24) दुपारी 3 वाजता शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे सभा होणार आहे.

Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांतलातूर / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ठिकठिकाणी स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी (दि. 24) दुपारी जाहीर सभा होणार आहे.सोलापूरची विमानसेवा बंद असल्याने ते लातूरमार्गे सिंहगड महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर उतरणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. 24) दुपारी 3 वाजता शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे सभा होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!