माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या हस्ते जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

जळकोट / प्रतिनिधी : राज्याचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी दुपारी जळकोट शहरातील केंद्रे शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक रवींद्र काळे, नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष मन्मथआप्पा किडे, जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेटे, संतोष तिडके आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!