राज्यातील 800 पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर; लातूर जिल्हा पोलीस दलातील आठ जणांचा समावेश

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : राज्यातील दोन उपमहानिरीक्षक, पाच पोलीस उपायुक्त, चार पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह 800 पोलिसांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामध्ये लातूर जिल्हा पोलीस दलातील आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबत पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी माहिती देत सर्व सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गात उत्तम कामगिरी आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक, पोलीस पदक, पोलीस शौर्य पदक दिले जाते. या पोलिसांना पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह अथवा सन्मानचिन्ह दिले जाते. सन 2023 या वर्षाकरिता राज्यातील 800 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवा, मिळालेले रिवार्ड, कामाची श्रेणी आदि निकषांच्या आधारे हे पदक दिले जाते.

पोलीस उपमहानिरीक्षक निवा जैन, पोलीस उपमहानिरीक्षक परमजीत दहिया, पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, पोलीस उप अधीक्षक विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. लातूर जिल्हा पोलीस दलातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक फौजदार संजय भोसले, सहायक फौजदार माधव केंद्रे, सहायक फौजदार बालासाहेब मस्के, सहायक फौजदार शिवाजी जाधव, पोलीस हवालदार अरुण डोंगरे, पोलीस हवालदार परमेश्वर अभंगे, पोलीस हवालदार शिवाजी गुरव यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!