राज्यात ‘लाच’ स्वीकारण्यासाठी या ठिकाणाकडे वाढला कल

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

खाद्या शासकीय लोकसेवकाकडे कांही काम असले की त्यास चिरीमिरी देऊन करून घेणे हे काही नवीन नाही. त्यात आता शासकीय कार्यालयात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणावर आणि हॉटेलात सीसीटीव्ही लागल्यामुळे लाचखोर थेट स्वतःच्या हातामध्ये चिरीमिरी न घेता जवळच्या एखाद्या पान टपरीवाल्याकडे किंवा आपल्या हस्तकाकडे ते पैसे द्यायला सांगत काम करून देतात. अर्थात, हे झाले नित्याचे फंडे; पण भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी यंत्रणा आता अधिक सतर्क होत असल्यामुळे ज्यांना लाचखोरी करायची आहे, त्यांनी आता अधिक मेंदू चालवत नवनवीन फंडे शोधून काढले आहेत.

मागील कांही वर्षात उन्हाळा ऋतूत ‘सूर्य आग ओकू लागला’ म्हणजे काय ते आता आपण अनुभवतोच आहोत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. तशी ही नक्षत्रे कोरडेपणा घेऊन येणारी, रखरखीत आणि पेटत्या उन्हाचा दाह सोसायला लावणारी या दिवसांतली तगमग म्हणूनच असह्य करते. अंगाची लाहीलाही होणे म्हणजे काय ते याच दिवसांत कळते. त्यामुळे बरेचजण वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहेत. त्यात आता शासकीय लोकसेवक ही घरातूनच आपले काम मार्गी लावत आहेत. घरातच मिनी कार्यालय थाटत आहेत. त्यामुळेच की काय मागील कांही महिण्यात लाचखोरांना घरात किंवा घराच्या पार्किंग मध्ये लाच घेताना पकडण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून निदर्शनास येते. उन्हाचा पारा वाढल्यामुळे अथवा घरात लाच घेणे सुरक्षित वाटतं असल्यामुळेच की काय लाच घेण्याचे ठिकाण म्हणून लाचखोरांचा राहत्या घराकडे कल वाढला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!