» मुखपत्र दक्षता वृत्तांत
शिरूर अनंतपाळ / प्रतिनिधी : येथील शिवनेरी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.प्रशांत कुमदाळे यांना स्वारातीम विद्यापीठाची नुकतीच पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी परभणी येथील शिवाजी कॉलेजचे रसायनशाखा विभाग प्रमुख डॉ नानासाहेब शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र विषयात संशोधन कार्य करून विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव माने, संस्थेचे सचिव पद्माकर मोगरगे, कोषाध्यक्ष जयेश माने, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड सुतेज माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. बी. धालगडे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा.कुमदाळे यांचे अभिनंदन केले आहे. प्रा. प्रशांत कुमदाळे यांच्या यशाचे कौतुक शिरूर अनंतपाळ ग्रामस्थांसह मित्रपरिवारातून होत आहे़.