दहा लाखांचा धनादेश वारसाला प्रदान; पोलीस पतीच्या निधनानंतर पतसंस्थेच्या ग्रुप इन्शुरन्सचा कुटुंबाला आधार

2 Min Read

»मुखपत्र दक्षता वृत्तांत

यातून लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर ही कायमपणे सभासद/कर्मचाऱ्यांसोबत आहे तसेच त्यांचे पश्चात देखील त्यांच्या कुटुंबियासोबत आहे. हे दिसून येते. पोलीस पतसंस्था ही भविष्यात देखील नेहमी सभासद/पोलीस अंमलदार यांच्या आर्थिक उन्नती करता प्रयत्न करत राहील. त्या पद्धतीने आम्ही नवनवीन योजना आखत आहोत. त्याकरता सभासदांचे देखील चांगले सहकार्य मिळत आहे.

– परमेश्वर ढेकणे, चेअरमन, लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर.

लातूर / प्रतिनिधी : पोलीस पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीसह कुटुंबापुढे आर्थिक प्रश्‍न उभा राहिला. मात्र, लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर यांच्या ग्रुप इन्शुरन्सचा आधार या कुटुंबाला मिळाला. दि-न्यू इंडिया इन्शुरन्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड इन्शुरन्स कंपनीकडून नुकताच मृताच्या वारसाला अपघाती विम्याचे दहा लाख रुपयांचा धनादेश जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. धनादेश प्रदान करताना पतसंस्थेचे चेअरमन परमेश्वर ढेकणे, सचिव माधव सारोळे, व्हाईस चेअरमन श्रीमती शिवलकर, सहसचिव रवी कांबळे, संचालक गोविंद सरवदे व सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते. पोलीस अंमलदार बब्रुवान तपघाले यांचे मागील वर्षी रोड अपघातात जखमी होऊन निधन झाले होते. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर यांच्या सर्व सभासदांचे ग्रुप इन्शुरन्स काढण्यात येत असते. पतसंस्थेचे सभासद पोलीस अंमलदार ब. नं.864 बब्रुवान तपघाले नेमणूक पोलीस ठाणे शिरूर आनंतपाळ यांचे दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाद्वारे या अपघाती विम्याचा दावा दि-न्यू इंडिया इन्शुरन्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड कंपनीकडे करण्यात सादर करण्यात आला. विद्यमान संचालक मंडळाने  इन्शुरन्स कंपनीच्या मुख्यालयास भेटी देवुन, त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून ग्रुप इन्शुरन्स क्लेम मंजूर करून घेतला आहे. त्यानंतर मयत बब्रुवान तपघाले यांच्या पत्नी/वारस यांच्या नावे अपघाती विमा दाव्याचा दहा लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर यांच्या वतीने सभासदांना/पोलीस कर्मचाऱ्यांना अपघाती विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने अपघाती विमा प्रदान करण्यात येतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!