»मुखपत्र दक्षता वृत्तांत
कोल्हापूर / प्रतिनिधी : इचलकरंजी शहरासह जिल्हा हद्दीतील “जर्मनी गँग” टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आज (दि.१२) रोजी दिले आहेत.
१) आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी, रा. सरकारी दवाखान्याजवळ, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, याचा तसेच व टोळीतील २) अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी, रा. सरकारी दवाखान्याजवळ, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, ३) बजरंग अरुण फातले, रा. दत्त मंदीर शेजारी, शास्त्री सोसायटी, लिगाडे मळा, जवाहरनगर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, ४) शुभम सदाशिव पट्टणकुडे, रा. लक्ष्मीमाळ, रुई रोड, कबनूर, ता. हातकणंगले, ५) अमृत उर्फ अमर नारायण शिंगे, रा. सहारानगर, गल्ली नं. ७, रुई, ता. हातकणंगले, ६) शोहेब मेहबुब पठाण, रा. अक्सा मश्जीदजवळ, लिगाडे मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले, ७) विवेक उर्फ श्री विश्वास लोखंडे, रा. साई मंदीराजवळ, स्वामी मळा, इचलकरंजी, ता. हातकणंगले अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्यामार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडे “जर्मनी गँग”विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी देत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी “जर्मनी गँग” टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश दिले.
सदर “जर्मनी गँग” टोळीविरुध्द एकुण २६ गंभीर गुन्हे त्यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणीकरीता अपहरण, खंडणी वसुली, प्राणघातक शस्त्रानिशी गर्दीमारामारी, किरकोळ व गंभीर दुखापत, आर्म्स अॅक्ट, चोरी, घरफोडी चोरी असे दाखल आहे.