दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून ; अवघ्या कांही तासात राजारामपुरी पोलीसांनी केली गुन्ह्याची उकल

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

कोल्हापूर / प्रतिनिधी : सोबत दारू पित असताना झालेल्या वादातून मित्राने आपल्या पेक्षा वयाने लहान असलेल्या मित्राचा खून केला. ही घटना शनिवारी (दि.१२) पहाटे साडे पाचच्या पूर्वी राजारामपुरी ७ वी गल्ली येथे घडली.

दिनेश अशोक सोळांकुरकर (वय ३४, रा. रेखानगर, गारगोटी जि.कोल्हापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सन्मेश अशोक तेंडुलकर वय ५४, रा. प्लॅट नं.एस १ कोटणीस हाईटस राजारामपुरी ७ वी गल्ली, कोल्हापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश अशोक सोळांकुरकर हे सन्मेश अशोक तेंडुलकर याच्यासोबत राजारामपुरी येथे शनिवारी दारू पित होते. दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून सन्मेश याने दिनेश याच्या पाठीमागुन काखेमध्ये हात घालुन मानेपर्यंत घटट पकडुन त्यास दाबुन जीवे ठार मारुन खून केला. पोलिसांनी या प्रकरणात सन्मेश अशोक तेंडुलकर यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.

सदर खुनाच्या गुन्ह्याची उकल जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, कोल्हापूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनात राजारामपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या नेतृत्वात सहा. पोलीस निरीक्षक विकास अडसुळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक समीर शेख, पोलीस अंमलदार अरविंद पाटील, रंगराव चव्हाण, रणजित साळवी, हरीष सुर्यवंशी, विशाल शिरगावकर, सुरेश काळे यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!