विदेशी दारूच्या ९०० बॉक्ससह ट्रक पळविणारे चौघे गजाआड ; जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग व चाकूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी 

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : चालकास मारहाण करुन विदेशी दारूचा ट्रक पळविणाऱ्या ४ आरोपीना जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग व चाकूर पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. विदेशी दारूचे बॉक्स, एक ट्रक असा ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

रविवारी (दि.१२) चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्रीच्या दरम्यान आष्टामोडनजीक टोलनाका पास झाल्यानंतर जीप व कार गाडीतील ८ इसमांनी विदेशी दारूची वाहतूक करणारा ट्रक (अंदाजे किंमत १५ लाख रुपये), ट्रक मधील ४ मोबाईल (अंदाजे किंमत ३२ हजार रुपये), रोख रक्कम १० हजार २६० रुपये, विदेशी दारूचे ९९० बॉक्स (अंदाजे किंमत ६२ लाख ६९ हजार २९२ रुपये) असा एकूण ७८ लाख ११ हजार ५५२ रुपयाच्या जबरी दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन गुन्ह्याची उकल होण्याच्या अनुषंगाने तपास पथक नेमून तपास पथकाला सूचना केल्या होत्या. याच अनुषंगाने दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पथकाने सदर गुन्ह्याची उकल करत ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी चाकूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वभंर पल्लेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार प्रदीप स्वामी, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, रियाज सौदागर, राजेश कंचे, योगेश गायकवाड, रामहरी भोसले, साहेबराव हाके, दीनानाथ देवकते, रवी गोंदकर, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, नकुल पाटील, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, व्यंकट निटुरे, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!