दुचाकीच्या धडकेने तरुण जखमी; रेणापूर नाका परिसरातील घटना 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : एका दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे वाहन चालवून दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण जखमी झाला. ही घटना रेल्वे स्टेशन ते रेणापूर नाका मार्गावर रेणापूर नाक्याजवळ सार्वजनिक रोडवर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, शहरातील साई नाका, अंबाजोगाई रोड येथील आनंद दिगंबर गुंडडवाड हे दि.२६ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशनहून रेणापूर नाका मार्गावर दुचाकी (एमएच २४, एझेड ८५४३) वरून निघाले होते. ते रेणापूर नाक्याजवळ सार्वजनिक रोडवर आले असता अज्ञात दुचाकीस्वाराने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून आनंद गुंडडवाड यांच्या दुचाकीस उजव्या बाजूने धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. याप्रकरणी आनंद दिगंबर गुंडडवाड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी अज्ञात दुचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ चामे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!