तीस हजारांची लाच घेताना महिला कारकून एसीबीच्या जाळ्यात 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

कोल्हापूर / प्रतिनिधी : कागल तहसील कार्यालयातील महिला अव्वल कारकून श्रीमती अश्विनी अतुल कारंडे याना तीस हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली. २१ मे रोजी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्री चा व्यवसाय करीत असून त्यांनी भाडे करारवरती कागल तालुक्यात जमीन घेतली असून सदर जमीन एन ए करणेकरिता त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मुळ मालकाचे वतीने अर्ज केला होता.

यामध्ये आलोसे अश्विनी कारंडे यांनी काम करण्यासाठी स्वतःसाठी साठ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी तीस हजार रुपये लाच रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मागणी केलेप्रमाणे आलोसे कारंडे यांनी तक्रारदार यांचेकडून तीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस अंमलदार अजय चव्हाण, सुधीर पाटील यांच्या पथकाने केली. याबाबत कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!