लातूर / प्रतिनिधी : जिल्हा गुन्हे अन्वेषन विभागात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार नितीन कठारे यांचा लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यासाठी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाभरातील पोलिसांकडून चालणारे कामकाजाचे जिल्हा पोलीस दलाकडून दरमहा परीक्षण केले जाते. एप्रिल २०२४ या महिन्याच्या मूल्यमापनात लातूर शहर व जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एकूण ९ फरारी आरोपीचा गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेवून त्यांना अटक करत विविध गुन्ह्याची उकल केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस अंमलदार नितीन कठारे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस अधीक्षकांकडून सन्मानित झाल्याबद्दल श्री. कठारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.