» मुखपत्र दक्षता वृत्तांत
औराद शहाजनी / प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या स्कॉर्पिओतून चंदनाची छुपी तस्करी सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी साडे सात लाखांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. सचिन शिवदास माने (वय २९ रा.अंबुलगा बु. तालुका निलंगा जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांना चंदनाची छुपी तस्करी सुरु आहे अशी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकांना सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला स्कॉर्पिओ (एम एच १४ सी एस १९४४) वाहनासह ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रथम गाड़ी रिकामी असल्याचे सांगितले मात्र पथकाने गाडीची पूर्ण झड़ती घेतल्यानंतर गोण्यांमध्ये ४० किलोग्राम वजनाची चंदनाच्या गाभ्याची लाकडे, प्रतिबंधीत व संरक्षित चंदनाची सालीसकट ९० किलोग्राम वजनाची लाकडे मिळून आली. आरोपी सचिन शिवदास माने (वय २९ रा.अंबुलगा बु. तालुका निलंगा जि. लातूर) याला अटक केली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार चंद्रकांत डांगे, नवनाथ हासबे, माधव बिलापटे, मोहन सुरवसे, तुराब पठाण, कुंभार यांनी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास औराद शहाजनी पोलीस करत आहेत.