» मुखपत्र दक्षता वृत्तांत
औसा / प्रतिनिधी : तालुक्यातील लामजना येथील जिल्हा परिषद शाळेत रविवारी २ जूनला सन २००८- २००९ सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला.
जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाला येथे घेण्यात आलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मुख्याधिपिका पंडीत मॅडम या होत्या. कार्यक्रमाचे नियोजन सचिन फुलारी यांनी केले. माजी विद्यार्थी स्नेहा दिक्षित, पल्लवी सगर, एजाज रोजेवाले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या शाळेतील अनेक विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, वकील, व्यवसाय, पत्रकारिता, प्रशासकीय सेवा, याबरोबर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्म, कला, शेती, एन.जी. ओ., कॉन्ट्रॅक्टर, बँक आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्वांशी विचारविनिमय व सुसंवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थी ओमप्रकाश कांबळे, अमोल आळंगे, सोनाली शिंदे, हैदर खजुरे, जुबेर पटेल, ज्योती पाटील यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणीना उजाळा देऊन शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पन्नासच्यावर माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. आभार प्रदर्शन अमर शिंदे यांनी केले.