महावितरणच्या रोहित्रातून हजारोंचे ऑइल चोरीला

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

अहमदपूर (जि. लातूर ) : तालुक्यातील मौजे वायगाव गावातील महावितरणच्या रोहित्रामधील अज्ञाताने एकूण ३५ हजार रुपये किमतीच्या ऑईलची चोरी केल्याची व ऑईल चोरी गेल्याने डीपी जळून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना हि शुक्रवार ३१ मे २०२४ रोजी १२ वाजेपासून ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी शिरूर ताजबंद येथील महावितरणचे सहायक अभियंता सोमेश्वर गुजराथी यांच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार साळवे हे पुढील तपास करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!