राज्यातील ४४९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या 

3 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या पदोन्नती व बदली प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील ४४९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती दिली. मागील कांही काळापासून पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले होते अखेर त्यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात येऊन बदली करण्यात आली आहे. यामध्ये गजेंद्र भानुदासराव सरोदे (नांदेड ते धाराशिव), इंद्रजित शिवाजीराव वर्धन (सोलापूर शहर ते पो.प्र.केंद्र, लातूर), बाबासाहेब हरिश्चंद्र काकडे (सोलापूर ग्रामोण ते मुंबई शहर), सुजाता किशनराव शानमे (पुणे शहर ते पो.प्र.केंद्र, लातूर), सविता मारोतीराव कलटवाड (ला.प्र.वि. ते मुंबई शहर), बाजीराव जगन्नाथ ढेकळे (पुणे ग्रामीण ते पो.प्र.केंद्र, लातूर), गणेश व्यंकटराव कराड (रायगड ते पो.प्र.केंद्र, लातूर), विनायक अनंत कारेगांवकर (ला.प्र.वि. ते पो.प्र.केंद्र, लातूर), कविता बाळु मुसळे (धाराशिव ते पो.प्र.केंद्र, लातूर), सोपान सोनाजी चित्तमपल्ले (नांदेड ते मुंबई शहर), प्रशांत ज्ञानोबा आरदवाड (पिंपरी-चिंचवड ते द.वि.प.), अशोक नवनाथ माळी (छ. संभाजीनगर ग्रामीण ते पो.प्र.केंद्र, लातूर), धनंजय सावताराम ढोणे (लातूर ते बीड), व्यंकटेश्वर सुग्रीव आलेवार (लातूर ते अमरावती शहर), बालाजी रामराव भंडे (नांदेड ते पो.प्र.केंद्र. लातूर), मुस्तफा इस्माईल शेख (बीड ते पो.प्र.केंद्र, लातूर), रणजित पांडुरंग गलांडे (ला.प्र.वि. ते पो.प्र. केंद्र, लातूर), महादेव हनुमंतराव मांजरमकर (हिंगोली ते पो.प्र.केंद्र. लातूर), रोहित धन्यकुमार दिवसे (सातारा ते रा.गु.वि.), शैलेश सुनिलराव शिंदे (पो.प्र.केंद्र, तुरची ते पो.प्र.केंद्र. लातूर), सुरेखा संजय धस (बीड ते पो.प्र.केंद्र, लातूर), हर्षद अरुण गालिंदे (म.सु.प. ते गु.अ.वि.), शिवदास निवृत्ती लहाने (पुणे शहर ते गु.अ.वि), अश्विनी किसनराव शेंडगे (नागपूर शहर ते पो.प्र.केंद्र, मरोळ), अमोल पांडुरंग ढोले (छ. संभाजीनगर शहर ते मुंबई शहर), नवनाथ रघुनाथ गायकवाड (धाराशिव ते मुंबई शहर), वासंती विश्वनाथ जाधव (पुणे शहर ते मुंबई शहर), प्रकाश लक्ष्मण लिंगे (मुंबई शहर ते मुंबई शहर), संजय युवराज क्षीरसागर (पो.प्र. केंद्र, तुरची तासगाव ते मुंबई शहर), दिपा विरसिंग रंधवा (मुंबई शहर ते मुंबई शहर), विष्णु बबन आव्हाड (जळगाव ते मुंबई शहर), अभिजीत भास्करराव अहिरराव (बुलढाणा ते मुंबई शहर), हेमंत अरुणराव कडूकार (अमरावती ग्रामीण ते मुंबई शहर), धनंजय मुकुंद देवडीकर (द.वि.प. ते मुंबई शहर), प्रशांत आनंदा पाटील (ला.प्र.वि. ते मुंबई शहर), हेमंत विजय बेंडाळे (धुळे ते मुंबई शहर), अमर विजयसिंह पाटील (रत्नागिरी ते अ.न.प्र.त.स., पालघर), चंद्रकांत बाबासाहेब कांबळे (मुंबई शहर ते मुंबई शहर), मनिषा कल्याणराव मुरूमकर (मुंबई शहर ते मुंबई शहर), सरोजिनी विलास पाटील (सातारा ते मुंबई शहर), नारायण अश्रुबा मिसाळ (सोलापूर ग्रामोण ते मुंबई शहर), सचिन आनंदराव पाटील (ला.प्र.वि. ते मुंबई शहर) यांच्यासह ४४९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पदोन्नतीने बदली करण्यात आली. राज्यातील ४४९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीने पोलीस निरीक्षक पद मिळाल्यानंतर सध्याच्या ठिकाणावरून बदली होणार आहे. बदली झालेल्या ठिकाणी मुलांसाठी शाळेत प्रवेश मिळवणे आणि घरातील सामान पोहचविण्याची दुहेरी कसरत करावी लागणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!