महेश नवमी:माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी प्रीत्यर्थ लातूर मध्ये दोन दिवसीय विविध कार्यक्रम

5 Min Read

आपल्या माहेश्वरी समाजाची एकजूटता असणे महत्त्वाचे आहे. तरी सर्व माहेश्वरी समाजबांधवांना विनम्र निवेदन आहे की, महेश नवमीनिमित आपला एक दिवस आपल्या समाजासाठी द्यावा. सर्वांनी आपआपल्या आस्थापना दुपारनंतर बंद ठेऊन महेश नवमीनिमित आयोजित कार्यक्रमात, शोभायात्रा मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवुन या भव्यदिव्य सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवावी. व मोठया उत्साहात महेश नवमी कार्यक्रम साजरा करावा.

सीए प्रकाश कासट,

अध्यक्ष

लातूर जिल्हा माहेश्वरी सभा

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 15 जून रोजी लातुरात माहेश्वरी सभेच्या वतीने माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमी पर्व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसह मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. हास्य व्यंग कवी संमेलन, सन्मान सोहळा, भव्य शोभायात्रा असे १५ व १६ जून असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

     शहरात माहेश्वरी समाजबांधवांची संख्या मोठी आहे. लातूर शहरात प्रतिवर्षी महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. यंदाही लातुरात माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी दमदार आणि थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे. महेश नवमीनिमित्त शनिवार दि. १५ जून आणि रविवार दि.१६ जून असे दोन दिवसीय विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये शनिवार दि.१५ जून रोजी सकाळी नऊ वाजता भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीची सुरूवात बालाजी मंदिर येथून होणार असून, ही रॅली जुना रेणापूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, गंज गोलाई, सराफ लाईन, गुळ मार्केट, शिवनेरी गेट अशी निघून गौरी शंकर मंदीर येथे रॅलीची सांगता होणार आहे.

दरम्यान, शनिवार दि १५ जून रोजी महेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाजाची एकजूटता आणि मजबूत संघटन दिसणार आहे. त्यानिमित्ताने शहरात भव्य अशी श्री भगवान महेश यांची शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा प्रमुख ईश्वर बाहेती व संतोष तोष्णीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसरातील गौरीशंकर मंदिर ते बालाजी मंदीर अशी असणार आहे. या शोभायात्रेचा मार्ग हा गौरीशंकर मंदीर मार्केट यार्ड लातूर- गुळ मार्केट – हनुमान चौक – गंजगोलाई -सुभाष चौक- खडक हनुमान – पापविनाश रोड बालाजी मंदीर असा असणार असून बालाजी मंदीर येथे शोभा यात्राची सांगता होणार आहे. या शोभायात्रेत माहेश्वरी ढोलताशा पथक, सुमन संस्कार प्रेप स्कुल द्वारे झांकीया सादर करण्यात येणार आहे. शोभायात्रेनंतर भगवान महेश यांची आरती होऊन तिकीट धारकांतून महेशनावनिमित्त लक्की-ड्रॉ काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भोजन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्नेहभोजन धुत परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी बालाजी मंदिर गार्डन येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.

याबरोबरच रविवार, दि.१६ जून रोजी शहरातील दयानंद सभागृहात सायंकाळी ४ वाजता समाजासाठी अतुलनिय योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये माहेश्वरी समाजातील अनेक समाजबांधवांनी समाजासाठी अतुलनिय योगदान दिले आहे. अशा व्यक्तींचा महेश भुषण, महेश गौरव, महेश सेवा आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या गौरव सोहळयाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा अध्यक्ष मधुसूदन गांधी हे राहणार असून अ‍खिल भारतीय माहेश्वरी महासभेचे संयुक्त मंत्री जुगलकिशोर लोहिया, लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सी.ए. प्रकाश कासट, सचिव फुलचंद काबरा, कोषाध्यक्ष जगदिश भुतडा यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सर्व समाजबांधवांनी महेश उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर जिल्हा माहेश्वरी सभा, लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन,लातूर, माहेश्वरी महासभा, माहेश्वरी मंडळ, माहेश्वरी युगल्स, लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन, लातूर शहर माहेश्वरी सभा, गावभाग माहेश्वरी संघटन, भाग्यनगर माहेश्वरी संघटन, अपनी राधाकृष्ण गोशाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हास्य व्यंग कवी संमेलन

गौरव सोहळयाच्या कार्यक्रमानंतर लागलीच दि. १६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दयानंद सभागृहात हास्य व्यंग कवी संमेलन होणार आहे. यामध्ये हास्य व्यंगकार डॉ. प्रविण राही, हास्य व्यंग दिपक शुक्ला, कवियत्री नीलम सोमाणी, कवयित्री गीतू माहेश्वरी, गीतकार धर्मेंद्र सोलंकी हे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत. या कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सीए प्रकाश कासट, सचिव फुलचंद काबरा, व समस्त लातूर जिल्हा माहेश्वरी सभा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!