जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीस २४ तासाचे आता अटक ; गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : शहरातील जुने बसस्थानकांच्या पाठीमागील रस्त्यावर जबरी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीना गांधी चौक पोलिसांनी चोवीस तासात अटक करून गुन्ह्यातील मोबाईलसह रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.

वैभव व्यंकट अटखीळे (वय-२८, रा.हालकी ता. शिरूरअनंतपाळ जि.लातूर आणि महेश ताजु कांबळे रा-संजय नगर लातूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पहिल्या घटनेत फिर्यादी खलंन्दरशाह बाबुशाह फकीर ( वय ३४, रा.ताडमुंगळी ता. निलंगा जि.लातूर ) हे दि.१० जून रोजी रात्री ११ वाजता जुने बसस्थानक रेल्वे स्टेशनन पाठीमागील पायदळ रस्त्याने गावाकडे जात असताना दोन अनोळखी इसमाने त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील एक मोबाईल (अं.किं.१५ हजार रुपये) व रोख ८०० रुपये रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेला होता तर दुसऱ्या घटनेत फिर्यादी नामे महादेव हनुमंत भक्ते (वय-२८, रा.भिकार सारोळा ता.जि.धाराशिव ह.मु. मांजरा गेट रेल्वे कोच फॅक्टरी लातूर) हे सरकारी दवाखाना लातूर येथुन औषधोपचार घेवुन पायवाटेने जुने बसस्थानक- जुने रेल्वेस्थानक पाठीमागील पायदळ रस्त्याने गांधी चौकाकडे येत असताना दोन अनोळखी इसमाने रस्त्यात आडवुन चाकुचा धाक दाखवुन पिशवीमध्ये ठेवलेले रोख साडे अकरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले असल्याची ११ जून रोजी तक्रार दिली होती. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखत तांत्रिक व कौशल्यपूर्ण गुन्ह्याचा तपास करून आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली. गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल एक मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज हस्तगत केला. दोन्ही आरोपी हे पोलिस कस्टडी मध्ये असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रगटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन,पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, राम गवारे, रणवीर देशमुख, दत्तात्रय शिंदे, शिवाजी पाटील, संतोष गिरी, भाडुळे यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!