परभणीकरांच्या सेवेत नवीन ‘टायटन वर्ल्डस्टोर’ सज्ज 

3 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

परभणी / प्रतिनिधी : घडयाळे आणि वेयरेबल्स बनवणारी आघाडीची भारतीय कंपनी टायटन कंपनी लिमिटेडने परभणीतील पहिले टायटनवर्ल्ड स्टोर सुरु केल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये टायटनच्या धोरणात्मक विस्तारामध्ये हा एक लक्षणीय टप्पा आहे. आता परभणीकरांना प्रीमियम घड्याळे आणि लाइफस्टाइल ऍक्सेसरीज त्यांच्या स्वतःच्या शहरात विकत घेता येणार आहेत. ६०० चौरस फुटांचे टायटन वर्ल्डस्टोर भगवान महावीर चौक, शिवाजी रोड येथे आहे. रिटेलिंग- वॉचेस विभागाचे डेप्युटी ग्रुप मॅनेजर श्री.गौरव बोरा यांच्या हस्ते स्टोरचा शुभारंभ करण्यात आला.

नवे टायटन वर्ल्ड स्टोर परभणीतील घड्याळे आणि फॅशनच्या चाहत्यांसाठी एक लॅन्डमार्क डेस्टिनेशन बनेल. शहरातील या पहिल्या टायटन रिटेल स्टोरमध्ये टायटनच्या सर्वोत्तम घड्याळांची सर्वसमावेशक आणि विशेष निवड करण्यात आलेली श्रेणी उपलब्ध करवून देण्यात आली आहे. ग्राहकांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि बजेटनुसार घड्याळे व फॅशन ऍक्सेसरीज याठिकाणी मिळतील. सुबक फॉर्मल घड्याळांपासून ते ट्रेंडी कॅज्युअल वेयरेबल्सपर्यंत, टायटनच्या आयकॉनिक कलेक्शन्सची विशाल श्रेणी याठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या स्टाईलचे परफेक्ट मॅच याठिकाणी अवश्य मिळेल. घड्याळां बरोबरीनेच विविध लाइफस्टाइल ऍक्सेसरीज व स्कीन परफ्युम देखील याठिकाणी मिळतील.

रिटेलिंग – वॉचेस विभागाचे डेप्युटी ग्रुप मॅनेजर श्री.गौरव बोरा यांनी सांगितले, टायटन अनुभव परभणीकरांना प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये टायटनचे स्थान मजबूत करण्याच्या आमच्या व्हिजनला अनुसरून हा धोरणात्मक विस्तार केला जात आहे. आमच्या ग्राहकांना अतुलनीय रिटेल अनुभव प्रदान करण्याप्रती आमची बांधिलकी देशभरातील विस्ताराची प्रेरणा ठरत आहे. परभणीमध्ये प्रीमियम घड्याळे आणि लाइफस्टाइल उत्पादनांची मागणी वाढत आहे, त्यामुळे ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. या शहरातील पहिले आणि महाराष्ट्रातील ८७ वे स्टोर सुरु करून आम्ही वैविध्यपूर्ण ब्रँड पोर्टफोलिओ व सर्वोत्तम रिटेल अनुभव उपलब्ध करवून देत आहोत. आमच्या ग्राहकांच्या वाढत्या, बदलत्या आवडी निवडी याठिकाणी पूर्ण होतील. हे नवे स्टोर स्थानिक पातळीवर ग्राहकांशी संबंध दृढ करण्याची संधी ठरेल. अतुलनीय उत्पादने आणि सेवा प्रदान करून आमच्या ग्राहकांना आनंद व समाधान प्रदान करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

गुणवत्ता, स्टाईल आणि अतुलनीय ग्राहक सेवा यांचा मिलाप परभणीच्या नवीनटायटन वर्ल्ड स्टोरमध्ये अनुभवायला मिळेल. नवीन स्टोरच्या शुभारंभानिमित्त निवडक उत्पादनांवर ४० टक्के विशेष सूटदिली जात आहे. १४ ते २३ जून २०२४पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल. टायटन वर्ल्डने परभणीतील घड्याळे व फॅशनप्रेमींना या नवीन स्टोरमध्ये येऊन प्रीमियम घड्याळे व लाइफस्टाइल ऍक्सेसरीजचा अनुभव घेण्यासाठी आग्रहाचे आमंत्रित केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!