कामाची बातमीः लातूरमध्ये १९ जूनपासून पोलिस भरती; ६४ जागांसाठी हजारो अर्ज, जाणून घ्या कशी होईल प्रक्रिया

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर/ साईनाथ घोणे : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) व पोलीस शिपाई (चालक) पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आहे. उमेदवारांना कोणी प्रलोभन दाखविल्यास तसेच गैरप्रकार आढळल्यास, कांही आक्षेप असल्यास तक्रार असल्यास त्यांनी दुरध्वनी क्रमांक ०२३८२-२४२२९६ वरती तसेच या कार्यालयाचे ई-मेल आयडी sp.latur@mahapolice.gov.in वर सविस्तर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी केले आहे. जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) यांची व पोलीस शिपाई चालकपदासाठी १९ जूनपासून मैदानी चाचणीतून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. एकूण ६४ पदांच्या भरतीसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेदरम्यान, बनावट उमेदवार बसवण्यासारखा भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमॅट्रिक पद्धत वापरण्यात येणार असून भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार बैठकीत भरतीच्या संदर्भाने माहिती देण्यात आली. लातूर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई यांची (३९), पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) यांची (०५) व पोलीस शिपाई चालक यांची (२०) अशा एकुण (६४) पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी एकत्रित ५ हजार पेक्षा अधिक अर्ज आले असून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे चाचणी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली. मैदानी चाचणीसाठी पावसाचा व्यत्यय आला तर त्या संबंधित उमेदवारांना पुढील तारीख देण्यात येईल. मात्र, त्यासाठी चाचणीशी संबंधित नोंदणीची कागदपत्रे त्याने स्वत:जवळ ठेवणे आवश्यक आहे.

भरतीप्रक्रियेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती

पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना कांही फसवणूक करणारे कामाला लागतात. त्यांच्याकडून उमेदवारांना वेगवेगळी आमिषे दाखवण्यात येत असतात. भरतीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करतानाच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी फसवणूक करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके निर्माण केल्याची माहिती दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!