पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

अकोला / प्रतिनिधी : इयत्ता दहावी व बारावीत विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या पोलिस पाल्यांचा सत्कार शनिवार (दि.२२) रोजी राणी महल, पोलीस लॉन अकोला येथे करण्यात आला. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतुन करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमात सुमारे ४१ गुणवंत पोलीस पाल्य आणि कुटुंबीय हजर होते. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, डीवायएसपी सतिश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अकोला पोलीस दलातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्रथम तीन प्राविण्य मिळविलेले पाल्य तसेच इतर सर्व गुणवत्ता प्राप्त पोलीस पाल्यांना पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या शुभ हस्ते भेट वस्तु देवून गुणगौरव करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी १० वी १२ वी नंतर पुढील शैक्षणिक बाबीवर प्रकाश टाकत उज्वल भविष्यासाठी महत्वाचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. आपले स्वःताचे अनुभव सांगितले व पोलीस पाल्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावर समाधान न राहता अजुन याहीपेक्षा जास्त प्रयत्न करावे अकोला पोलीस दलातील आजचे पाल्य हे उदयाचे डॉक्टर, इंजीनियर, एमपीएसी, युपीएसी यशस्वी रीत्या पार पाडुन आपले व आपल्या वडीलांचे तसेच अकोला पोलीसांचे नाव उंचावतील असा आशावाद व्यक्त केला. पोलीस पाल्यांनी ही आपले मनोगत व्यक्त करतांना आनंद व्यक्त करत पोलीस विभागाचे आभार मानले तसेच पुढील शिक्षणाकरिता सदरचा कार्यक्रम हा प्रेरणा देणारा ठरला असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके, राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके व त्यांची टीम, यांनी विशेष सहकार्य केले. तर आभार प्रदर्शन प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय नाफडे यांनी तर सुत्रसंचालन पोलीस अंमलदार गोपाल मुकुंदे यांनी केले. गुणवंत पाल्यांच्या झालेल्या सत्कारांमुळे अनेक पोलिसांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तर अनेकांना गहीवर आला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!