देशभरातील ‘नीट’ परीक्षेतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; एनटीए च्या महासंचालकांना पदावरून हटवले

1 Min Read
पुन्हा नीटची परीक्षा घ्या, या व अन्य मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला होता.
पुन्हा नीटची परीक्षा घ्या, या व अन्य मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

मागील काही दिवसापासून देशभरात ‘नीट’ परीक्षेतील कथित अनियमिततेवरून विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या कार्यप्रणालीवर विद्यार्थ्यांतून/ पालकांतून शंका उपस्थित केली जात होती. अशावेळी केंद्र सरकारने शनिवारी रात्री ९ वाजता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) महासंचालकांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना हटवण्यात आले असून कर्नाटक केडरच्या १९८५ च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तत्पूर्वी, दुपारी केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी व त्यात पारदर्शकता आणण्यासाठी ७ सदस्यांची उच्चस्तरीय समितीची घोषणा केली. ही समिती दोन महिन्यांत शिक्षण मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!