वाल्हेकरवाडीतील मनपा शाळेत शिक्षकांची कमतरता; शिक्षकांची नेमणूक करण्याची शिवसेना (उबाठा) गटाची मागणी 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

पिंपरी चिंचवड / आर. एम. कांबळे : वाल्हेकरवाडीतील महापालिकेच्या मुलांच्या शाळेमध्ये रिक्त जागांवर शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना (उबाठा) गटाच्या महिला उपशहर संघटिका ज्योती संदीप भालके यांनी सहायक आयुक्त यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

वाल्हेकरवाडीतील मनपाच्या शाळेतील पहिली ते पाचवीची पटसंख्या ३५० आहे. तर सहावी ते सातवीचा पटसंख्या १४० आहे. यानुसार शाळेमध्ये १४ शिक्षकांची आवश्यकता आहे. पटसंख्येनुसार शाळेला अजून ४ उपशिक्षक व ३ पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. तसेच विद्यमान मुख्याध्यापिका देखील एक महिन्याने निवृत्त होणार आहेत. मुलांच्या सुट्या संपून शाळा चालू झालेली आहे, तरी अद्याप शिक्षकांची नेमणूक झालेली नाही. शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाल्हेकरवाडीतील शाळेतील मुलांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर १५ दिवसात शिक्षकांची नियुक्ती झाली नाही, तर शाळेसमोर ठिय्या आंदोलन करू असा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. या वेळी शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर, विभाग प्रमुख संदीप भालके उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!