श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलचा ३७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा 

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

बालेवाडी ,पुणे / आर. एम कांबळे : विद्यार्थिनीना शिक्षण घेण्यासाठी येत असलेले अडथळे पाहून श्री गणपतराव बालवडकर यांनी स्वतः च्या राहत्या घरात सुरु शाळा सुरु केली आणि १९८८ साली स्थापन झालेल्या श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचा प्रवास बालवर्ग ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत पोहचला आहे. श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलचा ३७ वा वर्धापनदिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेतील शैक्षणिक कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षामध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या विदयार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी सीएमआयएसच्या आणि ज्ञानसागर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सच्या विदयार्थ्यांनी अतिशय सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विश्वजित सागर बालवडकर ह्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांने अतिशय सुरेख पद्धतीने संस्थेत चालू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती नाटुकली च्या माध्यमातून दिली.

सदर कार्यक्रमात मार्गदर्शनपर आभार व्यक्त करताना, पुढील पिढी उत्तम घडवायची असेल तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उत्तम आणि परिपूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे असे मत संस्थेचे सचिव डॉ.सागर बालवडकर यांनी व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर यांनी सर्व शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली त्याच बरोबर आदरणीय आमदार रामभाऊ मोझे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा उभी केली. प्रत्येक माणूस महत्वाचा असतो म्हणून माणुसकी जपली पाहिजे असेही सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी सतीश गंधे, ॲड.माशाळकर, लक्ष्मण बालवडकर, प्रकाश बेंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम दुबल, विजयराव कोलते, दिलीप फलटणकर, उपसंचालक शिक्षण विभाग श्रीराम पानझाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डफळ सर यांनी तर आभार प्रदर्शन लोहाकरे सर यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!