राज्यातील २७५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या ; बदल्यांमध्ये उदगीर येथील पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांच्या बदलीचा समावेश

1 Min Read

 » मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : राज्यभरातील कालावधी पूर्ण होऊन बदलीच्या कक्षेत असलेल्या २७५ पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी (दि.२४) या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. याबदल्यांमध्ये लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये कालावधी पूर्ण झालेले उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांची मसूप येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांची सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका असल्याने त्यांची लातूर जिल्हा पोलीस दलातील कामगिरी ही अत्यंत चांगली राहिलेली आहे. श्री. चेरले यांनी लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली असून सध्या ते उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. राज्यात पोलीस दलातील फक्त कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस उपनिरीक्षक यांचे बदल्यांचे आदेश आलेले आहेत. पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी हे बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!