लातूरची गुणवत्ता बावन्नकशी सोनं ; लातूरच्या शिक्षणक्षेत्राला बदनाम करण्याचा डाव?

3 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर/ साईनाथ घोणे : जिल्ह्यातील शिक्षकांनी, शैक्षणिक संस्थानी सुमारे ४६ वर्षापूर्वी विद्यार्थ्यांच्या यशासाठी सुरु केलेला ज्ञानदानाचा अग्निकुंड आज देखील सातत्याने सुरु आहे. लातूर येथील शिक्षणाचा “लातूर पॅटर्न” हा अपघाताने तयार झालेला नसून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या अनेक गुरुजणांची मागील पाच दशकापासूनची तपश्चर्या आहे. इयत्ता दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिला महत्वाचा टप्पा. या टप्प्यावर लातूर विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने आपल्या गुणवत्तेचा ठसा कायम यशस्वीरित्या उंचावत ठेवला आहे. राज्यात लातूर विभागातील सन २०२२- २०२३ सालच्या गुणवंत विद्यार्थ्यांपैकी तब्बल १०८ विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले होते. तर सन २०२३-२०२४ सालच्या लातूर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांपैकी तब्बल १२३ विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेणारे ठरले. यापूर्वी ही शिक्षण मंडळाकडून दहावीतील गुणवत्ता यादीची संकल्पना रद्द ठरवली जाईपर्यंत लातूरचा विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला आला नाही असे अपवादानेच घडले असावे. पुढे चालून याच अकरावी, बारावीच्या गुणवंत असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त वेळ देऊन लातूर जिल्ह्यातील तज्ञ शिक्षकांनी शिक्षणाप्रति समर्पण भावनेतून प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले. यामुळे वैद्यकीय पूर्व परीक्षा क्षेत्रात लातूर पॅटर्न यशाचा पॅटर्न बनल्याची भावना विद्यार्थी -पालकांमध्ये आहे. अश्याप्रकारे दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांच्या यशातून आजचा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण झाला. यातून गुणवत्तेची खाण म्हणून लातूरची ओळख राज्यात झाली. वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखा ही विद्यार्थ्यांना संपन्नता प्रदान करणाऱ्या शाखा आहेत. या ओढीमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा लोंढा लातूरकडे येऊ लागला. प्रत्येक वर्षी लातूर मध्ये तयारी वैद्यकीय शिक्षण पूर्व परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एम्स सारख्या नामांकित शिक्षण संस्थेत ही लातूरच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

 

Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांतलातूर/ साईनाथ घोणे : जिल्ह्यातील शिक्षकांनी, शैक्षणिक संस्थानी सुमारे ४६ वर्षापूर्वी विद्यार्थ्यांच्या यशासाठी सुरु केलेला ज्ञानदानाचा अग्निकुंड आज देखील सातत्याने सुरु आहे. लातूर येथील शिक्षणाचा “लातूर पॅटर्न” हा अपघाताने तयार झालेला नसून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या अनेक गुरुजणांची मागील पाच दशकापासूनची तपश्चर्या आहे. इयत्ता दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिला महत्वाचा टप्पा. या टप्प्यावर लातूर विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने आपल्या गुणवत्तेचा ठसा कायम यशस्वीरित्या उंचावत ठेवला आहे. राज्यात लातूर विभागातील सन २०२२- २०२३ सालच्या गुणवंत विद्यार्थ्यांपैकी तब्बल १०८ विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले होते. तर सन २०२३-२०२४ सालच्या लातूर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांपैकी तब्बल १२३ विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेणारे ठरले. यापूर्वी ही शिक्षण मंडळाकडून दहावीतील गुणवत्ता यादीची संकल्पना रद्द ठरवली जाईपर्यंत लातूरचा विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला आला नाही असे अपवादानेच घडले असावे. पुढे चालून याच अकरावी, बारावीच्या गुणवंत असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त वेळ देऊन लातूर जिल्ह्यातील तज्ञ शिक्षकांनी शिक्षणाप्रति समर्पण भावनेतून प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले. यामुळे वैद्यकीय पूर्व परीक्षा क्षेत्रात लातूर पॅटर्न यशाचा पॅटर्न बनल्याची भावना विद्यार्थी -पालकांमध्ये आहे. अश्याप्रकारे दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांच्या यशातून आजचा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण झाला. यातून गुणवत्तेची खाण म्हणून लातूरची ओळख राज्यात झाली. वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखा ही विद्यार्थ्यांना संपन्नता प्रदान करणाऱ्या शाखा आहेत. या ओढीमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा लोंढा लातूरकडे येऊ लागला. प्रत्येक वर्षी लातूर मध्ये तयारी वैद्यकीय शिक्षण पूर्व परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एम्स सारख्या नामांकित शिक्षण संस्थेत ही लातूरच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.लातूरच्या शिक्षणक्षेत्राला बदनाम करण्याचा डाव?लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यात त्या दोन शिक्षकांचा लातूर पॅटर्न मध्ये योगदान देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील एकाही शैक्षणिक संस्थेचा संबंध किंवा सहभाग असल्याबाबत अदयापपर्यंत तरी अधिकृत पोलीस विभागाकडून काहीच माहिती दिली गेली नाही. परंतु वारंवार लातूरच्या शिक्षणक्षेत्राशी याचा संबंध असू शकतो अशा चर्चा सुरु आहे. हा लातूरच्या शिक्षणक्षेत्राला बदनाम करण्याचा डाव? तर नाही असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या पुढील तपासात ‘दूध का दुध, पाणी का पाणी’ होऊन जाईल आणि सत्यता बाहेर येईल परंतु आजमितीला या प्रकरणाचा थेट संबंध लातूरच्या शिक्षण क्षेत्राशी लावणे चुकीचे ठरेल.

लातूरच्या शिक्षणक्षेत्राला बदनाम करण्याचा डाव?

लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यात त्या दोन शिक्षकांचा लातूर पॅटर्न मध्ये योगदान देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील एकाही शैक्षणिक संस्थेचा संबंध किंवा सहभाग असल्याबाबत अदयापपर्यंत तरी अधिकृत पोलीस विभागाकडून काहीच माहिती दिली गेली नाही. परंतु वारंवार लातूरच्या शिक्षणक्षेत्राशी याचा संबंध असू शकतो अशा चर्चा सुरु आहे. हा लातूरच्या शिक्षणक्षेत्राला बदनाम करण्याचा डाव? तर नाही असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या पुढील तपासात ‘दूध का दुध, पाणी का पाणी’ होऊन जाईल आणि सत्यता बाहेर येईल परंतु आजमितीला या प्रकरणाचा थेट संबंध लातूरच्या शिक्षण क्षेत्राशी लावणे चुकीचे ठरेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!