सोलापूर चिकन चायनीज सेंटर, टेस्टी झोन हॉटेलमध्ये आढळले बालकामगार; गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल

1 Min Read

बालकामगारांना कामावर ठेवू नये, असे फलक व्यवसाय-उद्योगाच्या ठिकाणी लावणे अनिवार्य आहे. हे माहीत असतानाही ते कुठेच लावले जात असताना दिसत नाहीत.

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस पथकाने धाड टाकत शहरातील मध्यवर्ती बस स्थानक जवळील सोलापूर चिकन चायनीज सेंटर व हॉटेल टेस्टी झोन हॉटेलवर कारवाई केली. हॉटेलमध्ये बालकामगार अंगमेहनतीचे काम करताना आढळून आले. आढळून आलेल्या दोन्ही बालकांना ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळा पुढे हजर केले असता त्यांची रवानगी बाल गृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी सोलापूर चिकन चायनीज सेंटर, मध्यवर्ती बस स्थानका जवळ, हॉटेल चालक फुरकान मुस्ताक कुरेशी रा.६० फुटी रोड, लातूर व हॉटेल टेस्टी झोन काँग्रेस भवन च्या मागे हॉटेल चालक मिनाज युनूस घावरी रा. खोरी गल्ली लातूर यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार चित्तलवाड हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव सुदामती वंगे, लता गिरी, चालक मनियार व चाईल्ड लाईनच्या अलका सन्मुखराव यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!