धनगर आरक्षणासाठी लातुरात आमरण उपोषण सुरु ; आंदोलक चंद्रकांत हजारे यांचा मागे न हटण्याचा निर्धार

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस. टी) प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी धनगर समाजाने लातूर मधून निर्णायक लढ्याची हाक देत आंदोलन सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हजारे, अनिल गोवेकर यानी आमरण उपोषणास सुरुवात केली धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले एसटी आरक्षण तात्काळ लागू करावे, अन्यथा आपण आंदोलन मागे घेणार नसल्याची आक्रमक भूमिका श्री.हजारे यांनी घेतली असून, त्यांच्या या आंदोलनाला धनगर समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे. २८ जून रोजी चंद्रकांत हजारे, अनिल गोवेकर यांनी आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे झाले आणि उपोषणे झाले; अनेक वेळा साखळी उपोषण, रास्तारोको, मुंडण आंदोलन, निवेदने, सभा, रेल रोको आंदोलने झाले तरी सुद्धा सर्वच सत्ताधारी पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. आजपर्यंत सरकार कडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. म्हणून दि २८ जून २०२४ रोजी सकाळपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक समोर सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत हजारे, अनिल गोवेकर यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

यावेळी अॅड. अनिरुद्ध येचाळे, आर्वी ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन सुरवसे, राजेश खटके, अनिल पांढरे इत्यादी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!