गुणवंतांची नगरी लातूरच्या घवघवीत यशाची परंपरा कायम; चन्नबसवेश्वर फार्मसीची परवीन शेख महाराष्ट्रात सर्वप्रथम 

3 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) उन्हाळी परीक्षा २०२४चा निकाल नुकताच जाहीर झाला असून लातूर स्थित चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज ची विद्यार्थिनी कु. परवीन हमीद शेख ९२ टक्के गुण प्राप्त करून महाराष्ट्रात सर्वप्रथम क्रमांक पटकावला असून याच महाविद्यालायची कु. घोडके वैष्णवी बाबुराव हिने ८९ टक्के गुण प्राप्त करून महाराष्ट्रात सर्व द्वितीय येण्याचा मान पटकावला आहे. यानिमित्ताने चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजचे शैक्षणिक क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ह्या वर्षी डी फार्मसी द्वितीय वर्ष परीक्षेमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पंधरा असून प्रथम श्रेणी मध्ये २२ विद्यार्थ्याना यश संपादन केले आहे.

 प्रथम वर्ष डी फार्मसी च्या परीक्षेमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८ असून प्रथम श्रेणी मध्ये १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १९८० पासून औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम राबवणारे चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज हे महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालय असून शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखत असतानाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक क्रीडाविषयक, आरोग्यविषयक, पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते यामुळेच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसोबत समाजाच्या सर्व घटकांचा परिपूर्ण विकास करण्याचा ध्यास व त्यादृष्टीने सततचे प्रयत्न या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून केले जातात. फार्मसी कॉऊंसील ऑफ इंडिया च्या वतीने डी फार्मसीसाठी देशभर नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. या नवीन अभ्यासक्रमानुसार फार्मसिस्ट हा फक्त औषध विक्रेता न राहता औषध तज्ञ म्हणून समाजात कार्य करावे असे अपेक्षित असताना व नवीन अभ्यासक्रम राबविताना येत असलेल्या अनेक अडचणीवर मात करणे चन्नबसवेश्वर महाविद्यालयाने परत एक वेळेस या निकालाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या कॉलेजचे डी फार्मसी चे विद्यार्थी दरवर्षी राज्यस्तरावर विभागीयस्तरावर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतात. कॉलेजच्या या आगळ्यावेगळ्या सुत्रामुळे चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजने आदर्शवत लातूर फार्मसी पॅटर्न तयार केला आहे याची नोंद व अनुकरण राज्याच्या कानाकोपऱ्यांत केले जाते. डी. फार्मसी चा निकालाच्या माध्यमातून चन्नबसवेश्वर च्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा परत एकदा रोवला गेला. ह्यावर्षीच्या दर्जेदार निकालामुळे लातूरच्या फार्मसीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आनंद व्यक्त होत आहे.

सर्व गुणवंत विद्यार्थिनी, विद्यार्थी यांचे पंचाक्षरी शिवाचार्य ट्रस्टचे सचिव भीमाशंकर देवणीकर, संचालक विजयकुमार मठपती, अरुण हरगुडे, डॉ. अशोक सांगवीकर, अनुप देवणीकर, प्राचार्य डॉ. संजय थोटे तसेच प्राध्यापाक व कर्मचारी मंडळाच्या वतीने कौतुक केले.

सर्व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे कौतुक प्रा. प्रताप भोसले, प्रा. रवि राजूरकर, प्रा. बसवराज सुगावे, प्रा. रामलिंग सुगावे, प्रा. दत्ताहरी कवडेवार, प्रा. गंगासागर कर्डिले, कार्यालयीन अधिक्षक शिवहर विभूते, ग्रंथालय प्रमुख प्रदीप रामेगावकर, अमोल सोनकांबळे, ईश्वर डोंगरे, गणेश स्वामी, काशीनाथ स्वामी, सिद्धेश्वर स्वामी, अक्षय खंडापुरे, स्वाती ऐतनबोने, शारदा स्वामी, धनराज स्वामी गुरुलिंग पिचे, अरुण स्वामी, युवराज खुणे, सिद्धेश्वर वैरागकर, शिवसांब राचट्टे आदींनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!