नांदेड परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी शहाजी उमाप यांची नियुक्ती ; राज्यातील ७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

1 Min Read
प्रातिनिधिक फोटो-  मुखपत्र दक्षता टीम
प्रातिनिधिक फोटो- मुखपत्र दक्षता टीम

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : Maharashtra IPS Officer Transfer | राज्यातील पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गृहमंत्रालयाने मंगळवारी या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत एच. महावरकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या ठिकाणी शहाजी उमाप (अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर डी. टी. शिंदे यांची अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार या पदावर बदली करण्यात आली आहे. तर श्रीकांत व्ही. पाठक यांची अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर पदी बदली करण्यात आली.

अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर पदावर कार्यरत संजय बी. जाधव यांची अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर या पदावर बदली करण्यात आली आहे.

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शिवाजी टी. राठोड यांची वरिष्ठ अधिकारी शहाजी उमाप यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई अपर पोलीस आयुक्त पदावर अभिषेक भगवान त्रिमुखे यांची बदली करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!