एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस महासंचालकावर लिहिलेल्या पुस्तकाची सर्वत्र चर्चा ; प्रकाशनापूर्वीच पहिली आवृत्ती संपली

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : मुखपृष्ठावरील आत्मविश्वासपूर्ण व शिस्तप्रिय चेहरा राज्याच्या पोलीस प्रमुख पदापर्यंत पोहोचलेल्या ज्या व्यक्तीचा आहे, त्यांच्यावरील ‘काळजातील पोलीस महासंचालक’ या पुस्तकाची चर्चा सध्या फार वाढली आहे, एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस महासंचालकावर लिहिलेले हे आगळे- वेगळे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण पैलू दाखवते, हे पुस्तक महाराष्ट्र पोलीस सेवेतील प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याने वाचले पाहिजे. किंबहुना महाराष्ट्र पोलीस सेवाच नव्हे तर भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनी अशा सर्वानीच वाचले पाहिजे असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर कळेल. वाईट प्रवृत्तींशी लढा देता येतो आणि वाईट प्रवृत्तींसमोर न झुकता त्यांना ठेचून काढता येते. विशेष करून भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांकडे या लढय़ासाठी आवश्यक असे अधिकार असतात. ते वापरावे लागतात अधिकारांच्या वापराला मूल्यांचा आधार हवा, तो संजय पांडे यांनी भारतीय पोलीस सेवेतील कार्यकाळात कसा जपला, याबद्दल या पुस्तकातून बरेच काही दिसून येते, देशाच्या घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेल्या पोलीस सेवेतील प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱ्यांने ते वाचून आत्मसात करायला हवे. सदर पुस्तकाला विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी प्रस्तावना दिलेली असून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उप-अधीक्षक प्रमोद पवार यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रकाशनापूर्वीच पहिली आवृत्ती संपलेली असून, लवकरच जळगाव मध्ये प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क

श्री विनोद पितांबर अहिरे, पोलीस नाईक, जळगाव पोलीस मो.9823136399

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!