माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी धनगर समाजाच्या उपोषण स्थळी दिली भेट

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण द्यावे या मागणीकडे राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात गेल्या १३ दिवसापासून उपोषणास बसलेल्या अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांची उपोषण स्थळी राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी बुधवारी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपने चौकशी केली. समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही आपल्या समाजासोबत असल्याचे सांगुन उपोषणकर्त्यानी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले .

माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी उपस्थित उपोषण करणारे चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर तसेच समाज बांधव यांच्याशी आरक्षण संदर्भात चर्चा केली त्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आम्ही आपल्यासोबत राहू असे सांगून सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लवकर निर्णय घ्यावा असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी माजी आमदार अॅड. त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी महापौर अॅड.दीपक सुळ, सुभाष घोडके, एकनाथ पाटील, संभाजी सुळ, अॅड.अनिरुद्ध येचाळे, विष्णू धायगुडे, डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष अॅड.प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, सचिन दाताळ यांच्यासह मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!