दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात; रजिस्ट्रेशन कार्यालयातील गैरकारभार चर्चेत

1 Min Read
» मुखपत्र दक्षता वृत्तांत
नांदेड / प्रतिनिधी : शेत जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. बालाजी शंकरराव उत्तरवार (दुय्यम निबंधक श्रेणी १, उप-निबंधक कार्यालय, हदगाव (वर्ग ३) असे त्यांचे नाव आहे.

तक्रारदार यांनी मौ. हदगाव येथील गट क्रमांक २५६/२ मध्ये २० गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. तक्रारदार नमुद शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगाव येथे जावून लोकसेवक उत्तरवार, दुय्यम निबंधक यांना भेटले असता त्यांनी या कामासाठी प्रथम १ लाख ९९ हजार रुपये नोंदणी व मुद्रांक फी सह लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची १२ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात बालाजी शंकरराव उत्तरवार यांनी तडजोडीअंती १ लाख १३ हजार ४०० रुपये नोंदणी व मुद्रांक ची पावती व ८१ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराकडून १ लाख ९५ हजार रुपयांची लाच स्विकारताना दुय्यम निबंधक उत्तरवार याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. उत्तरवार याच्यासह त्याच्यासोबत असलेल्या दोन खाजगी इसमालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. थेट दुय्यम निबंधकालाच लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याने रजिस्ट्रेशन कार्यालयातील गैरकारभार चर्चेत आला आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!