‘सीए’ परीक्षेत चाकूर तालुक्यातील सुरज आचवलेचे घवघवीत यश; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ठरणार प्रेरणादायी 

1 Min Read


» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे : देशात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल गुरुवार (दि.११) रोजी जाहीर करण्यात आला. देशामध्ये सर्वात कठीण परीक्षा म्हणून चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेकडे पाहिले जाते. यंदा ‘सीए’ अंतिम परीक्षेत चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील विद्यानिकेतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच सहकारमहर्षी सिद्रामप्पा आचवले यांचा नातू सुरज शरद आचवले या विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे. ‘सीए’ अंतिम परीक्षेसाठी ३५ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सीए अंतिम परीक्षेत वडवळ (ना.) येथील सुरज शरद आचवले या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळवत गावातून प्रथम सीए (सनदी लेखापाल) होण्याचा मान पटकावला. त्याचे हे यश ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!