शहाजी उमाप नांदेड परीक्षेत्राचे नवे IG: मावळते IG शशिकांत महावरकर यांच्याकडून स्वीकारला पदभार; नवे IG कडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या

1 Min Read

नांदेड परीक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा विद्यमान अपर पोलीस आयुक्त, (विशेष शाखा, बृहन्मुंबई) या पदावरून शहाजी उमाप यांनी गुरुवारी सकाळी नांदेड येथे आपला पदभार स्विकारला. गृह विभागाने मंगळवारी (दि.7) त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पिंपरी चिंचवड येथे सहआयुक्त पदी बदली झाली आहे. त्यांना यावेळी निरोप देण्यात आला त्यानंतर लागलीच शहाजी उमाप यांनी गुरुवारी सकाळी शहरात पोहोचून आपला पदभार स्विकारला.

नवे प्रभारी IG शहाजी उमाप यांच्याकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या 

मराठवाड्यातील लातूर, नांदेड याठिकाणी यापूर्वी पोलीस उपाधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून नूतन प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कर्तव्य बजावले आहे. त्यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास विशेषतः जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास प्राधान्य दिले होते. तसेच भ्रष्टाचार, स्ट्रीट क्राइम, जातीय हिंसाचार यांच्याविरोधात आपली झिरो टोलरन्सची भूमिका ठेवली होती. विद्यार्थी, महिला सुरक्षेसह औद्योगिक प्रगतीला चालना मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. आता नव्याने नांदेड परीक्षेत्रात त्यांच्या नियुक्तीने सर्वसामान्य नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!