गहाळ झालेले 205 मोबाईल शोधून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मोबाईल धारकास वाटप 

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

नांदेड : जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता नांदेड पोलिसांच्या वतीने मोहीम राबविण्यात आली होती. मोहिमेअंतर्गत नांदेड पोलिसांच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 205 मोबाईल (किंमत 32 लाख 89 हजार रूपये) हस्तगत केले. त्या मोबाईलचे एकत्रितरीत्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते मोबाईल धारकांना वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे “Nanded Police” या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 2024 मध्ये गहाळ झालेले 614 मोबाईल अंदाजीत रक्कम 1 कोटी 95 हजार रूपयाचे हस्तगत करण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराय धरणे, पोलीस उपअधीक्षक डॉ.अश्विनी जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे सायबर पोलीस उपनिरीक्षक एम. बी. चव्हाण, पोलीस अमंलदार मुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, दाविद पिडगे, मोहम्मद असीफ, विलास राठोड, रेशमा पठाण, काशीनाथ कारखेडे, किशोर जैस्वाल, मोहन स्वामी, दिपक शेवाळे, राज यन्नावार, व्यंकटेश सांगळे, दिपक राठोड यांनी पार पाडली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!