“डाक चौपाल” महामेळावा संपन्न; शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी डाक विभाग आपल्या दारी

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृत्तांत  

निलंगा : शासकीय योजनांची जाणीव व्हावी यासाठी हत्तरगा हालसी (ता.निलंगा) येथे डाक विभागामार्फत “डाक चौपाल” महामेळावा घेण्यात आला. यावेळी केंद्र व राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली.

निलंगा तालुक्यातील हत्तरगा हालसी गावात डाकघर अधीक्षक एस. एन. आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या भारतीय डाक चौपाल महामेळाव्यात उमरगा डाक उपविभागाचे डाक निरिक्षक डि.एल.मुंडे, सरपंच बाळासाहेब पाटील, हत्तरगा हालसी शाखेच्या शाखा डाकपाल डी.एस.शिंदे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश इंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरू पाटील, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन दत्ता इंगळे, माजी सरपंच पंडीत फुलसुरे, तसेच सर्व शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्ती व गावकरी यांची उपस्थिती होती. डाक विभागाने सुरू केलेले उपक्रम हे सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावे, त्यांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा या संकल्पनेतून डाक चौपाल या महामेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाक विभागाच्या सर्व कर्मचारी, शाळेतील शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

या योजनांविषयी दिली माहिती

आधार अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीयोजना, लेक लाडकी, सुकन्या सम्रृद्धी योजना, महिला सन्मान बचत पत्र, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती, ग्रामीण डाक जीवन विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, ज्येष्ठ नागरिक, नॅशनल सेविंग, भविष्य निर्वाह निधी, आरडी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!